Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Central Sector Scholarship for 12th Passed Student 2024-25

सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी 12000 रू शिष्यवृत्ती 2024-25
Central Sector Scholarship for 12th Passed Student
12000/year Scholarship 2024-25

Central Sector Scholarship for 12th Passed Student 12000/year Scholarship 2024-25
 

सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती सन २०२४-२५ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे

उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परीक्षेमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान तसेच व्यावसायिक (Vocational) या विद्याशाखांमधील उच्चतम गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारची सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेतर्फे राबविण्यात येते. सदर शिष्यवृत्तीसाठी केंद्रशासनाकडून महाराष्ट्र राज्यासाठी ७४१७ इतके नवीन मंजुरीसाठी संच निर्धारित केलेले आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी नविन मंजूरीचे आणि नूतनीकरणाचे (Renewal) अर्ज ऑनलाईन (Online) पध्दतीने मागविण्यात येत आहेत.

ऑफलाईन (Offline) पद्धतीने भरलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत. नवीन मंजूरीसाठी केंद्रशासनाकडून गुणवत्ता यादी (Merit List) तयार करण्यात येते. विद्यार्थ्यांना मंजूर इ गलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम केंद्रशासनामार्फत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात (Under DBT Mode) जमा करण्यात येते.

 

अर्ज करण्याची शेवटची मुदत

केंद्रशासनामार्फत नवीन शिष्यवृत्तीसाठी व नुतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत दिनांक ३१.१०.२०२४ अशी निर्धारित करण्यात आलेली आहे.

 

शिष्यवृत्ती बाबतच्या संकेतस्थळावरील मार्गदर्शक सूचना (Guidelines) FAQs काळजीपूर्वक वाचून त्यानुसार सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांना कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच सदर योजनेबाबतच्या केंद्रशासनाकडील नवीन / सुधारीत प्राप्त सूचनांसाठी NSP या संकेतस्थळाचे व या संचालनालयाच्या dhepune या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी करावे. होकेशनल

 

 किमान पात्रता व अटी

 

१. अर्जदार भारतीय नागरीक व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

 २. अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा / स्टायपेंडचा लाभार्थी नसावा.

 ३. अर्जदाराच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. ४.५ लाखापेक्षा अधिक नसावे.

 ४. सदर शिष्यवृत्ती पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मात्र कोणताही पदविका अभ्यासक्रम तसेच पत्राद्वारा व दूरस्थ शिक्षणासाठी (Diploma, Correspondence Courses & Distance Education) ही शिष्यवृत्ती योजना लागू नाही.

 

५. केंद्र शासनाच्या नियमानुसार सदर शिष्यवृत्ती, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ वर्षे व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी व कला वाणिज्य व विज्ञान अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ५ वर्षापर्यंत देय राहील.

 

सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती सन २०२४-२५ साठी प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कुलसचिव भावार्थ संस्थाप्रमुख पांची असेल. अर्जदाराच्या सोयीसाठी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना व SOP (standard opening procedure) dhepune या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येतील.

 

तरी आपल्या अधिनस्त महाविद्यालये, शैक्षणिक संस्था व विद्यापीठे यांना आपल्या स्तरावरुन सदर योजना प्रभावीपणे सबविण्यासाठो सूचना देण्यात पाव्यात व केलेल्या कार्यवाहोची माहिती या संचालनालयास देण्यात यावी.


विद्यापीठ / महाविद्यालय / संस्थेसाठी सूचना

विद्याथ्यांनी नवीन मंजूरीचा (Fresh) किया नूतनीकरणाचा (Renewal) चा ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवरुन अर्जाची छाननी करून ऑनलाईन मंजुरी देण्याची कार्यपध्दती पार पाडावी. तसेच मंजूर केलेले अर्ज व त्यासोबतची कागदपत्रे जतन करुन ठेवण्यात यावीत तपासणी अंती समितीस उपलब्ध करुण देण्यात यावी. संबंधित महाविद्यालयांनी विभागाने दिलेल्या युजर आय.डी. व पासवर्ड वापरुन विहित केलेल्या वेळेत लांगीन करावे व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत मुदतीतच पुढील स्तरावर ऑनलाईन फॉरवर्ड करावेत. अन्यथा सदर अर्ज अपात्र समजण्यात येतील.

  

अधिक माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा

नविन मंजूरी आणि नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपध्दती

अर्जा करण्या साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 

For more detail click given link

Online Application Procedure for Central Sector Scholarship New Approval and Renewal

Important Document of Central Sector Scholarship for Fresh and Renewal 2024-25


 


Post a Comment

1 Comments