Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Online Application Procedure for Central Sector Scholarship

 

नविन मंजूरी आणि नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपध्दती
Online Application Procedure for Central Sector Scholarship

New Approval and Renewal

 

Online Application Procedure for Central Sector Scholarship New Approval and Renewal

१. सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती या योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पात्र व इच्छुक विद्याथ्यांनी नवीन मंजूरीसाठी व नूतनीकरणासाठी NSP या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे.

 

२. विद्याथ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३१.१०.२०२४ ही आहे.

 

३. नवीन मंजूरीसाठी (Fresh) सदर योजनेसाठी HSC, CBSE ICSE चोर्डचे टॉप २० Percentile यादीतील सर्व विद्यार्थी या योजनेचा अर्ज करण्यास पात्र असतील. सदर शिष्यवृत्तीसाठी उच्च शिक्षण कार्यालयामार्फम केवळ उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची HSC बोर्डचे विद्यार्थ्यांची यादी संचालनालयाच्या dhepune वा संकेतस्थळावर लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.

 

४. ज्या विद्यार्थ्याकडे आधार क्रमांक आहे अशा विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक या पर्यायाचा वापर करुन अर्ज भरावा.

 

५. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे लाभ मिळणेसाठी आधार क्रमांक त्यांच्या वैकखात्याशी संलग्न (Link) असणे आवश्यक आहे. ज्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती रक्कम सुरळीतपणे जमा होण्यास मदत होईल.

 

६. विद्यार्थ्यांचा बैंक खाते चालू स्थितीत असणे (Operative/Active Mode) आवश्यक आहे. जेणेकरून शिष्यवृत्ती रक्कमेचे वितरण अयशस्वी (Fail) होणार नाही.

 

७. विद्यार्थ्यांचे बैंक खाते स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे. जॉइंट खाते नसावे. खाते क्रमांक व इतर बैंक तपशील भरण्यात विद्याथ्यांकडून चूक झाल्यामुळे शिष्यवृत्ती विलंबाने मिळाल्यास / न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत विद्यार्थ्यांची राहील.

 

८. ऑनलाईन अर्ज भरण्यापूवी विद्याथ्यांनी उपरोक्त संकेतस्थळाच्या Homepage वरील SOP (standard operating procedure) वाचून व समजून घेऊनच ऑनलाईन अर्ज भरावा.

 

९. ऑनलाईन अर्ज भरताना विचारण्यात आलेली माहिती पूर्णपणे भरुन, ऑनलाईन अर्जाची प्रत आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह आपल्या महाविदयालयाकडे पुढील कार्यवाहीकरिता सादर करावी.

 

१०. ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण निर्माण झाल्यास आपल्या महाविद्यालय / संस्थेशी संपर्क साधून सदर अर्ज महाविद्यालयाच्या/संस्थेच्या मदतीने पूर्ण करुन घ्यावा.

ऑनलाईन अर्ज भरण्या साठी

 

AL-FALAH COMPUTERS BEED

Near Milliya College

Quilla Maidan, Beed.

8208780081

येथे संपर्क साधावा

  

११. एखादा पात्र विद्यार्थी नुतनिकरणासाठी अर्ज करावयाचा राहीला असेल तर पुढील वर्षी अर्ज करण्यास पात्र असेल. (परंतु ज्या वर्षाचा अर्ज करण्याचा राहीला आहे त्या वर्षाचा लाभ मिळणार नाही.)

 

१२. एखादया पात्र विद्यार्थ्यांचा नुतनिकरणासाठी अर्ज महाविद्यालय स्तरावर पडताळणी करावयाचा राहीला असेल तर सर्व अशा सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्षी योजनेसाठी अर्ज करता येईल. (परंतू ज्या वर्षाचा अर्ज करण्याचा राहीला आहे त्या वर्षाचा लाभ मिळणार नाही.)


Post a Comment

0 Comments